गरोदरपणाची माहिती / गरोदरपण माहिती / गरोदरपणात माहिती
ह्या लेखात आपण गर्भधारणा, गरोदरपण, गरोदरपणात बाळाची हालचाल, गरोदरपणात काय खावे, गरोदरपणात माहिती, गरोदरपणात कोणते पदार्थ टाळावेत, गरोदरपणातील महिना, प्रेगनेंसी के शुरुवाती लक्षण, प्रेगनेंसी की जानकारी, प्रेगनेंसी के लक्षण ह्याबद्दल सर्व माहिती बघू.
तुम्हाला काही प्रश्न असल्यास तुम्ही खालील नंबर वर डॉक्टर सरिता वैद्य ह्यांच्याशी बोलू शकतात – डॉक्टर सरिता वैद्य (+919890143920) – किंवा आम्हाला संपर्क करण्या साठी इथे क्लिक करा – कॉन्टॅक्ट
प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात तिच्या विवाहानंतर मनात असलेलं एक स्वप्न म्हणजे तिला मूल होणं. प्रेग्नंसी ही स्त्रीला परिपूर्ण करणारा एक अनुभव असं म्हटलं जातं
गरोदरपणात माहिती / प्रेगनेंसी की जानकारी
अनेक मुलींना मात्र या गरोदर पणाबद्दल अनेक शंका मनात असतात. स्वतःचे करीयर, विवाहा नंतर बदलेली भूमिका, नवीन पहिल्या वर्षाचे सणवार यामध्ये पहिली 1-2 वर्षे काशी निघून जातात कळत नाही. नंतर आता आपल्याला मूल हवं असं दोघांनाही वाटू लागतं आणि तसे प्रयत्न सुरू होतात.
आपली जीवनशैली कितीही बदलली असली तरी निसर्ग आपले काम तसेच करत असतो. त्यामुळे पूर्वी गरोदर राहणे, मूल होणे आणि त्याचे संगोपन या गोष्टी लग्न झाल्यावर योग्य वेळी आपोआप होत असत. त्यासाठी डॉक्टर ची मदत क्वचित घ्यावी लागत असे.
हल्ली मुलींचे लग्नाचे वय सरासरी 25 च्या पुढे गेले आहे. पूर्वी ज्या वयात निदान एक मूल झालेले असे त्या वयात आता लग्न होते. त्यानंतर नोकरी, घर , नवीन लग्नाचा व संसाराचा अनुभव घेऊन आत्मविश्वास येईपर्यंत मूल बहुदा कोणालाच नको असते. यामध्ये 3 ते 5 वर्षे एवढा काल जाताना दिसतो. त्यामुळे हल्ली मुलीची पहिली प्रेग्नंसी वयाच्या तिशीच्या आसपास होते.
मुलीचे वय जसजसे मोठे होत जाईल तसतसे प्रेग्नंसी राहणे, त्यामध्ये त्रास न होणे, बाळाची सुदृढ व निकोप वाढ होणे यामध्ये थोडे थोडे अडथळे येऊ लागतात. त्यामुळे कदाचित हल्ली प्रत्येक प्रेग्नंसी ही precious pregnancy बनली आहे.
आपल्याला काहीही त्रास न होता अगदी नैसर्गिक सहजतेने मूल हवे असेल तर ते जितक्या लौकर होईल तितके चांगले.
गरोदर राहण्याची लक्षणे
ज्या मुलींची मासिक पाळी विवाहा नंतर नियमित असते त्यांची पाळी लांबली तर ती गर्भधारणे मुळे असू शकते मात्र त्याची खात्री प्रेग्नंसी टेस्ट केल्यावर आणि ती positive आल्यावर नक्की होते.
गरोदर राहिल्यावर साधारण काय लक्षणे दिसतात?
प्रत्येक स्त्रीला सगळी लक्षणे होतीलच असे अजिबात नाही. मात्र साधारणपणे मळमळणे, तोंडाला सतत पाणी सुटणे, सकाळी उलटी होणे, क्वचित दिवसभरात कधीही उलटी होणे, बारीक चक्कर येणे, थकवा वाटणे, वारंवार लघवीस लागणे ही लक्षणे दिसतात.खाण्याची इच्छा होत नाही किंवा काही विशिष्ट पदार्थ खावेसे वाटतात. ही लक्षणे साधारण पहिले 3 महीने राहतात आणि नंतर कमी कमी होत जातात.
महिना वार गर्भधारणा / गरोदर महिना प्रमाणे लक्षणे/ गरोदरपणातील महिना
प्रेग्नंसीचा एकूण काळ 9 महीने असतो. त्याची विभागणी एकूण तीन भागात होते
पहिले 3 महीने (first trimester),
दुसरे 3 महीने (second trimester),
तिसरे 3 महीने (third trimester)
पहिल्या 3 महिन्यात वर संगीतलेले त्रास होतात कारण त्यावेळी गर्भ गर्भाशया मध्ये स्थिर होत असतो.
दुसरे 3 महीने बाळाच्या सर्व अवयवांची वाढ पूर्ण होते.
तिसरे तीन महीने जे शेवटचे असतात त्यावेळी बाळाच्या सर्व अवयवांचे उत्तम पोषण होते, बाळाचे वजन योग्य वाढते व ते पूर्ण सुदृढ होऊन जन्म घेण्यास योग्य होते.
गरोदरपणा (प्रेग्नंसी) आणि गर्भसंस्कार
एकदा प्रेग्नंसी राहिली की त्यानंतर ते बाळ कसे होईल ? त्याची वाढ योग्य होईल का? त्याचे वजन चांगले भरेल का?ते बुद्धीने चांगले होईल का? असे अनेक प्रश्न आईच्या मनात येत असतात. या सगळ्या गोष्टी बाळाच्या वाढीच्या दृष्टीनेही अतिशय महत्वाच्या असतातच.
काही आजार किंवा अंतर्गत दोष असल्यास गोष्ट वेगळी, पण बाळ निकोप, हेल्दी हवे असेल तर ते बर्याच प्रमाणात गरोदर पणाच्या 9 महिन्यात आईचे खाणे-पिणे कसे आहे? ती दिलेली सर्व औषधे वेळेवर घेते का? वेळोवेळी नीट तपासण्या करते का? तिची मानसिक स्थिति या 9 महिन्यात काशी आहे? ती खूप ताणाखाली आहे की आनंदात आहे? अशा अनेक गोष्टींवर अवलंबून असते.
याचसाठी आयुर्वेदा मध्ये गर्भ संस्कार ही बाळासाठी खास ट्रीटमेंट दिली जाते. ज्यामधे बाळाच्या शरीराची बुद्धीची, मनाची निकोप वाढ व्हावी यासाठी ट्रीटमेंट दिली जाते. ही ट्रीटमेंट नऊ महीने आईने घेतल्यास त्याचा योग्य परिणाम बाळाच्या वाढीवर झालेला दिसतो.
मग आता यावरून हे लक्षात येतेच की कोणत्याही मार्गाने बाळ छान हवे तरी ट्रीटमेंट ही आईलाच घ्यावी लागते. कारण आईच्या गर्भाशयामधी नाळ बाळाशी जोडलेली असते ज्यामुळे आई जे खाते पिते त्याचे योग्य रूपांतर होऊन बाळाला पोषण जात असते.
गरोदरपणात काय खावे?
पहिले तीन महीने कदाचित थोडा त्रास होत असेल तेव्हा खाणे पिणे नीट जात नाही. अशावेळी दिवसाची सुरुवात शक्यतो कोरडे खाऊन करावी. जसे साळीच्या लाहया, चुरमुरे, खाकरा इ. म्हणजे मळमळ कमी होते. उलटी होते म्हणून खाणे टाळू नये. थोड्या थोड्या वेळाने जे जाईल ते खात राहावे. सरबत, सुप्स, असे द्रवपदार्थ घेत राहावे.पाणी पीत राहावे.हा त्रास तीन महिन्यांनी कमी होतो.
यानंतरचे 3 महीने बाळाच्या अवयव वाढीच्या दृष्टीने महत्वाचे असतात आणि त्यानंतरचे 3 महीने बाळाच्या पोषणा साठी. त्यामुळे या काळात आईचा आहार जितका चांगला तितके बाळ निरोगी होण्याची शक्यता जास्त.
गरोदरपणात कोणते पदार्थ टाळावेत?
सर्वात प्रथम म्हणजे दोन गोष्टींचा अतिरेक टाळावा. पहिली गोष्ट, इच्छा होते, खावंसं वाटतं म्हणून चमचमीत, तळलेले, पदार्थ जास्त खाऊ नयेत. दुसरी गोष्ट, प्रेग्नंट आहे म्हणून सतत पौष्टिक खाल्लं पाहिजे म्हणून बदाम,काजू,अक्रोड यासारख्या पदार्थांचा अतिरेक करू नये.
हळूहळू मळमळ,उलट्या कमी झाल्या की नेहेमी घेतो त्या आहारवर यावे. तुम्ही रोज, नियमितपणे संपूर्ण जेवण दोन वेळा, एक फळ रोज, सकाळी भुकेप्रमाणे नाश्ता आणि दिवसातून 2 वेळा दूध घेणे आवश्यक आहे. जेवणामद्धे डाळी,उसळी,भाज्या कोशिंबीरी सर्व घ्यावे.
गरोदर स्त्रीने काय खावे आणि काय खाऊ नये याबद्दल समाजात बरेच गैरसमज आहेत. मात्र अति तिखट, मसालेदार, तळलेले पदार्थ हे टाळणे, पपई सारखी फळे खाण्याचे टाळणे हे गरजेचे आहे. बाळाचे पोषण हे रोज आई काय खाते यातून होणार आहे.
आईने तिच्या पचनाला झेपेल असाच आहार घ्यावा आणि यासाठीच रोजचे ताजे, पचायला सुलभ, चविष्ट आणि सर्व समावेशक आहार घेणे गरजेचे. चहा,कॉफी कमीत कमी घ्यावे कोलड्रिंक्स, मद्यपान कटाक्षाने टाळावे. धूम्रपान हे बाळसाठी अतिशय धोकादायक असते त्यामुळे आईने किंवा तिच्या संपर्का मधील कोणीही धूम्रपान करू नये.
जसजसे महीने भरत जातात तसे पोटाचा आकार वाढत जातो. त्याचा दाब पचंनावर येतो आणि त्यामुळे भूक कामिजास्त होणे, शौचाला साफ न होणे आणि त्यामुळे अस्वस्थ वाटणे असे त्रास होतात पान यावर काही सोपे उपाय आहेत.रोज जेवण झाल्यावर ओवा,बडीशेप व तीळ एक एक चिमुट खावे. दुपारी काळ्या मनुका 10 ते 15 एक वाटी पाण्यात भिजत घालाव्यात आणि 3-4 तासांनी त्या चावून खाव्यात व ते पाणी पिऊन टाकावे.
प्रेग्नंसीमध्ये गोड पदार्थ किती खावेत?
खरे तर आहारमध्ये सगळे पदार्थ असावेत त्याप्रमाणे गोड थोडे खायला हरकत नाही. खीर, लाडू, शिरा, हलवा असे पदार्थ जरूर घ्यावेत. दुग्धजन्य मिठाई, पेढे, बर्फी सारखे पदार्थ पचनाड जड असतात त्यामुळे ते कमी खावेत. तसेच दही, लस्सी,मिल्कशेक हे पदार्थ देखील कमी खावेत. दूध, ताक घ्यावे. कधी कधी गरोदर पणी काही स्त्रीयांना डायबिटीस निघतो अशावेळी आपल्या डॉक्टरच्या सल्ल्याने गोड खावे मात्र इतर आहार पूर्ण घ्यावा.
निष्कर्ष
थोडक्यात गरोदरपणीच्या आपले रोजचे अन्न घ्यावे. डाळी, उसळी, भाज्या कोशिंबीर, रोज घ्यावे. फक्त पोळी-भाजी असे जेवण करू नये. फळे खावीत. दूध प्यावे. या सर्व आहारातून बाळाचे पोषण चांगले होते व रोजचा साधाच आहार ठेवल्याने आईस देखील पचनाचा कोणताही त्रास होत नाही.
डॉक्टर सरिता वैद्य (+919890143920) – किंवा आम्हाला संपर्क करण्या साठी इथे क्लिक करा – कॉन्टॅक्ट