गर्भधारणा

या लेखात कव्हर केलेले विषय: गर्भधारणा होण्यासाठी काय करावे,गर्भधारणा होण्यासाठी काय करावे लागते,गर्भधारणा होण्यासाठी काय खावे,गर्भधारणा होण्यासाठी उपाय,गर्भधारणा होण्यासाठी घरगुती उपाय,

प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात तिच्या विवाहानंतर मनात असलेलं एक स्वप्न म्हणजे तिला मूल होणं. गर्भधारणा ही
स्त्रीला परिपूर्ण करणारा एक अनुभव असं म्हटलं जातं.

अनेक मुलींना मात्र या गरोदर पणाबद्दल अनेक शंका मनात असतात. स्वतःचे करीयर, विवाहा नंतर बदलेली
भूमिका, नवीन पहिल्या वर्षाचे सणवार यामध्ये पहिली 1-2 वर्षे काशी निघून जातात कळत नाही. नंतर आता
आपल्याला मूल हवं असं दोघांनाही वाटू लागतं आणि तसे प्रयत्न सुरू होतात.

आपली जीवनशैली कितीही बदलली असली तरी निसर्ग आपले काम तसेच करत असतो. त्यामुळे पूर्वी गरोदर
राहणे, मूल होणे आणि त्याचे संगोपन या गोष्टी लग्न झाल्यावर योग्य वेळी आपोआप होत असत. त्यासाठी
डॉक्टर ची मदत क्वचित घ्यावी लागत असे.

हल्ली मुलींचे लग्नाचे वय सरासरी 25 च्या पुढे गेले आहे. पूर्वी ज्या वयात निदान एक मूल झालेले असे त्या
वयात आता लग्न होते. त्यानंतर नोकरी, घर , नवीन लग्नाचा व संसाराचा अनुभव घेऊन आत्मविश्वास
येईपर्यंत मूल बहुदा कोणालाच नको असते. यामध्ये 3 ते 5 वर्षे एवढा काल जाताना दिसतो. त्यामुळे हल्ली
मुलीची पहिली प्रेग्नंसी वयाच्या तिशीच्या आसपास होते.

मुलीचे वय जसजसे मोठे होत जाईल तसतसे प्रेग्नंसी राहणे, त्यामध्ये त्रास न होणे, बाळाची सुदृढ व निकोप
वाढ होणे यामध्ये थोडे थोडे अडथळे येऊ लागतात.त्यामुळे कदाचित हल्ली प्रत्येक प्रेग्नंसी ही ‘मौल्यवान गर्भधारणा’ (precious pregnancy) बनली आहे. मुळामध्ये प्रेग्नंसी म्हणजे जबाबदारी, आपल्या स्वातंत्र्यावर बंधने, बाहेर जाणे, प्रवास करणे,रात्री उशिरा पर्यन्त पार्टी करणे, बाहेरचे हवे तेवढे खाणे, याच कल्पना डोक्यामद्धे जास्त असतात. त्यामुळे मुली सहजपने याला तयार नसतात.

तसेच आर्थिक बाजू भक्कम असल्याशिवाय प्रेग्नंसी नको, हा एक अजून महत्वाचा विचार बहुतेक जणांच्या डोक्यात असतो. त्यामुळे मूल हवे यापेक्षा मूल का नको आहे याचेच विचार आणि स्वतःच्या मनाला तसे समजावणे जास्त प्रमाणात चालू असते .बदलत्या जीवन शैली प्रमाणे यातील काही गोष्टी योग्य असल्या तरी अतिविचार हा प्रेग्नंसी लांबवत नेतो आणि मग ज्यावेळी प्रकर्षाने आता मूल हवे असे वाटू लागते तो पर्यन्त वयाची तिशी ओलांडलेली असते.

मुळात मूल या विषयाचा “मूल नको” हा नकारात्मक विचार मनात सतत आणू नये. भले, काही महिन्यांनी
मूल चालेल किंवा एखाद्या वर्षाने मूल झाले तरी चालेल असा विचार असेल तर आम्हाला बाळ नक्की हवय
फक्त थोडे थांबलो आहोत त्यासाठी.. असा विचार हा मूल होण्यासाठी अतिशय सकारात्मक ठरतो. लग्न झाल्या
नंतर कियी दिवसात आपल्याला नक्की मूल हवे आहे हे ठरवणे महत्वाचे.

बर्‍याच जोडप्यांमद्धे त्याबद्दल स्पष्ट बोलणे नसते, तितका विचार नसतो. हाताशी बर्‍यापैकी खेळता पैसा आणि आठवड्यातील शनिवार –रविवार ची सुट्टी हा आरामदायी काळ सहजी सोडवत नसतो. त्यामुळे मुलाची चर्चा लांबणीवर पडत राहते. मात्र उशिरा झालेली मुलाची जाणीव ही नंतर गर्भ धारणा होण्यासाठी त्रासदायक ठरू शकते. आणि मग त्यावेळी मनावर येणारा ताण, सतत डॉक्टर च्या होणार्‍या फेर्‍या, सतत तपासण्या हे सगळेच तुमचं मूल होण्याचा
आनंद कमी करतात,मग ती एक तांत्रिक प्रक्रिया होऊन बसते.

गर्भधारणा होण्यासाठी काय करावे

गर्भधारणा होण्यासाठी काय करावे

गर्भधारणा होण्यासाठी काय करावे?

आपल्याला नैसर्गिक सहजतेने मूल हवे असेल तर ते जितक्या लौकर होईल तितके चांगले. मुळात लग्न करताना
आपल्याला कालांतराने मूलही होणार आहे याची मानसिक तयारी, त्याबद्दल चा विचार हा प्रत्येक जोडप्याने
करायला हवा. मग आपोआप च त्याबद्दल आपण किती थांबायचे आहे? आपली आज वये काय आहेत?
वैद्यकीय दृष्टीने आपल्या हातात नैसर्गिक रित्या मूल होण्यासाठी किती कालावधी आहे? याचा विचार करावा.
त्यासाठी तज्ञ डॉक्टर कडे जाऊन त्या बद्दल चर्चा करावी. त्यानंतर आपले निकोप वैवाहिक जीवन सुरू करावे.
शक्यतो 30 वर्षाचे आत पहिली गर्भ धारणा व्हावी.

गर्भ धारणा झाली की लगेच आपली सगळी मजा बंद होते. हा एक मोठा गैरसमज आहे. तुमची प्रेग्नंसी तुम्ही
कशी घेता? यावर ते अवलंबून आहे. प्रेग्नंसी असली तरीही नियमित पणे रोजचे काम, खाणे पिणे ,भेटी गाठी हे
चालूच राहते. फक्त त्यामध्ये काही छोटे बदल घडतात. जसे, खाणेपिणे काय असावे याचा जास्त बारकाईने
विचार करावा. जास्त पदार्थ खावे लागतात. थोड्या थोड्या वेळाने खावे लागते. पण हे सगळे आपण बाळसाठीच
करत असतो ना?

कामाचा अतिरिक्त ताण असल्यास तो नक्कीच कमी करावा लागतो. मधून मधून ब्रेक घ्यावा लागतो. रात्री
उशिरा पर्यन्त काम करत राहणे टाळावे लागते. पण हे सगळे आपण आपल्या बाळसाठीच करत असतो ना?
बाहेर फिरणे नक्कीच करू शकतो. मात्र पहिले तीन महीने प्रवास शक्यतो टाळावा. रोजचे ऑफिस करूच शकतो,
मात्र अगदीच आवश्यक नसेल तर बाहेरगावी जाणे, ख्ड्ड्यामधून प्रवास करणे टाळावे. तीन महिन्या नंतर एकदा
बाळ गर्भाशया मध्ये छान स्थिर स्थावर झाले की योग्य वेळी एखादा प्रवास करणे ही शक्य होते. पण सुरूवातीचे
तीन महीने जपावे लागते.पणआपण हे आपल्या बाळासाठीच करत असतो ना?

एकदा हा विचार मनात पक्का रूजला की, आपण हे बाळासाठी करत आहोत की, मग ते बंधन वाटत नाही.
आणि मग त्या विचारातील सकारात्मकता तुमच्या मनाला आनंद देते आणि तो आनंद तुमच्या बाळापर्यंत
नक्की पोचतो !!!

अधिक माहितीसाठी कृपया डॉ. सरिता वैद्य ह्यांच्याशी +91 98901 43920 बोला.  Contact Us