गर्भधारणा होण्यासाठी, गरोदर राहण्याचे उपाय, प्रेगनेंसी टिप्स, गर्भधारणा होण्यासाठी आयुर्वेदिक उपाय, प्रेग्नेंट होने के लक्षण, प्रेगनेंसी होने का उपाय, Pregnancy Tips.

गर्भधारणा (प्रेगनेंसी) बद्दल लग्न झाल्यानंतर मुलींच्या मनात अनेक शंका असतात. नवीन नवीन लग्न झालेले असताना लगेच गर्भधारणा (प्रेगनेंसी) नको असा विचार असतो, मात्र 1-2 वर्षांनंतर मूल हवं असे वाटू लागते.

गर्भधारणा (प्रेगनेंसी) साठी नक्की काय करायला हवे? मला प्रेग्नंसी राहील न? प्रेग्नंसी राहायला ट्रीटमेंट घ्यावीच लागते का? माझी डिलिव्हरी नॉर्मल होईल ना? माझ्या करियर चे काय होईल? असे अनेक प्रश्न तिच्या मनात येत असतात त्यामुळे एकीकडे प्रेग्नंसी हवी आहे पण मनात भीती खूप आहे अशा अनेक मुली किंवा विवाहित स्त्रिया पाहायला मिळतात. गर्भधारणा (प्रेगनेंसी) बद्दल च्या काही नेहेमी विचारल्या जाणार्‍या गोष्टींबद्दल आपण जाणून घेऊया आणि त्यावर काही टिप्स पाहूया.

1) गर्भधारणा (प्रेगनेंसी) कशी राहते?

स्त्रीयांच्या बीज कोषातुन दर महिन्याला परिपक्व असे स्त्रीबीज तयार होत असतात व ते बीजकोशातून बाहेर पडत असतात. ते बाहेर पडण्याचा काल हा साधारण  तिच्या मासिक पाळीच्या पहिल्या दिवसापासून 11 वा दिवस ते 17 वा दिवस हे 7-8 दिवस असतो. पुरुषांमध्ये पुरुष बीज हे वीर्यामधील शुक्रजंतूच्या स्वरुपात तयार असते. स्त्रीबीज बाहेर पडण्याच्या त्या एका आठवड्यात पती पत्नीचे संबंध आले असता गर्भ धारणा होण्याची शक्यता असते.

2) या काळात संबंध आला तर लगेच गर्भधारणा (प्रेगनेंसी) राहते का ?

नाही. याच काळात संबंध आला तरी लगेच प्रेग्नंसी राहिलाच असे खात्रीने सांगता येत नाही. कारण यासाठी स्त्री गर्भाशय स्थिति, स्त्री बीज पूर्ण परिपक्व आणि हेल्दी असणे आवश्यक असते. तिची शारीरिक व मानसिक स्थिति उत्तम असावी लागते.

गर्भधारणा

3) मग नैसर्गिक रित्या गर्भधारणा (प्रेगनेंसी) राहील की नाही हे कसे समजावे?

खरे तर आता आपल्याला मूल हवे हे ठरल्यावर पती आणि पत्नी यांनी तज्ञाचा सल्ला घ्यावा. त्यांनी सुचवल्या प्रमाणे काही प्राथमिक पण महत्वाच्या तपासण्या करून घ्याव्यात. जसे पुरुषांमध्ये रक्ताची तपासणी,वीर्याची तपासणी महत्वाची तर स्त्रीया मध्ये  सोनोग्राफी, रक्त तपासणी मूत्र तपासणी महत्वाची असते.

4) गर्भधारणा (प्रेगनेंसी) राहिली हे कसे कळते?

गर्भधारणा (प्रेगनेंसी) राहिल्याचे प्रमुख लक्षण म्हणजे मासिक पाळी चुकणे. दर महिन्याला नियमित येणारी पाळी जर एखाद्या महिन्या मध्ये आली नाही तर प्रेग्नंसी असण्याची शक्यता असते.

5) गर्भधारणा (प्रेगनेंसी) आहे का हे कळण्याचे मार्ग कोणते ?

पाळी चुकल्यावर साधारण 15 दिवस होऊन गेले की प्रेग्नंसी टेस्ट करता येते. याची हल्ली किट्स मिळतात ज्यावर घरच्या घरी टेस्ट करता येते. जर ती टेस्ट positive आली तर अजून 8 दिवसांनी रक्ताची तपासणी करून निदान पक्के करता येते.

What is Garbh Sanskar

6) गर्भधारणा (प्रेगनेंसी) आहे हे कळल्यावर काय करायचे असते ?

गर्भधारणा (प्रेगनेंसी) आहे हे एकदा नक्की झाले की तुम्ही एका आनंद दायी प्रवासाला सुरुवात करता. त्यामुळे मनाने आनंदी होऊन ते स्वीकारावे. आपल्या नेहेमीच्या स्त्रीरोग तज्ञ असतील तर त्यांना किंवा तसे कोणी नसेल तर माहिती काढून चांगल्या स्त्रीरोग तज्ञास एकदा भेटून यावे.

कारण यापुढील नऊ महीने आपल्याला त्यांची गरज लागणार असते, वेळोवेळी तपासण्या कराव्या लागतात, सोनोग्राफी कराव्या लागतात, काही औषधे घ्यावी लागतात. यासाठी तुम्ही जितक्या लौकर स्त्रीरोग तज्ञास भेटाल तितके चांगले.

यामध्ये तितकीच दुसरी महत्वाची व्यक्ती म्हणजे आयुर्वेद तज्ञ.आयुर्वेदामध्ये उत्तम गर्भधारणा (प्रेगनेंसी) आणि निरोगी सुदृढ बालक यासाठी गर्भसंस्कार चिकित्सा सांगितली आहे. आयुर्वेद तज्ञाकडून तुम्ही ती घेऊ शकता.या दोनही ट्रीटमेंट नऊ महीने चालू ठेवल्यास प्रेग्नंसी अतिशय सुलभ,आणि निरोगी जाऊ शकते.   

निष्कर्ष | Conclusion

थोडक्यात, आपल्याला मूल हवे आहे हे ठरल्यावर पती-पत्नीने वर सांगितलेल्या विशिष्ट कालावधी मध्ये नियमित संबंध ठेवावेत. त्या वेळी आपले शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम असेल असे बघावे. मनावर ताण नसावा. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे प्रेग्नंसी साठी 6 महीने तरी सातत्याने प्रयत्न करायला हवे. साधारणपणे एवढ्या काळात गर्भधारणा (प्रेगनेंसी) राहते मात्र ती न राहिल्यास वेळीच तज्ञाचा सल्ला घेता येतो व इतर काही तपासण्या किंवा उपचार करण्याची गरज असल्यास ती वेळीच करता येते.

स्त्री चे  वय 25 ते 30 असताना तिची पहिली गर्भ धारणा झाल्यास ती अतिशय हेल्दी  होते. त्यामुळे या वयात मूल होईल असा प्रयत्न असावा.